रावेर तालुक्यात अल्पवयीन अत्याचारातून गर्भवती : एकाविरोधात गुन्हा
Minor gets pregnant due to rape in Raver taluka : Crime against one रावेर (17 डिसेंबर 2024) : रावेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर वर्षभर बळजबरीने अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता गरोदर राहिली व तिने पुरूष जातीच्या अर्भकाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयीत करण प्रकाश भील (21, रावेर तालुका) याच्याविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
रावेर तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय पीडीता कुटूंबासह वास्तव्यास आहे. पीडीतेच्या असहाय्यतेचा फायदा घेत संशयीत करण भील याने 1 डिसेंबर 2023 ते 1 मार्च 2024 दरम्यान सातत्याने अत्याचार केल्याने पीडीता गर्भवती राहिली व तिने पुरूष जातीच्या बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीताविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.