लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींची दखल


जळगाव (17 डिसेंबर 2024) : नागपूर इथे राज्याचै हिवाळी अधिवेशन सुरू असून सोमवारी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी घोषणा केली. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने 35 हजार 788 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत या पुरवणी मागण्यांबद्दल माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे वचन दिले होते. त्यानंतर आता पहिल्याच हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या पुढच्या पैशांची सोय आता मुख्यमंत्र्यांनी सत्ता येताच केलेली आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यावर 1500 ऐवजी 2100 रुपये जमा होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


कॉपी करू नका.