यावल-चोपडा रस्त्यावर सीमला मिरची नेणार्‍या वाहणाचा अपघात ; चालक जखमी


Accident involving a vehicle carrying chillies to Seema on Yaval-Chopda road; driver injured यावल (18 डिसेंबर 2024) : यावल-चोपडा रस्त्यावर साकळी गावापुढे वळणावर मध्य प्रदेशातून मुंबईकडे सीमला मिरची घेऊन जाणार्‍या वाहनाचा अपघात झाला. वळणावर वाहन अनियंत्रीत होत उलटले. हा अपघात मंगळवारी घडला. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे तर सीमला मिरची रस्त्यात मात्र सैरावैरा पसरून नुकसान झाले.

अनियंत्रीत वाहन झाल्याने अपघात
यावल-चोपडा रस्त्यावर साकळी गावापुढे चुंचाळे गावादरम्यान वळणावरून मध्य प्रदेशातील हर्दा येथून सीमला मिरची घेऊन वाहन क्रमांक (एम.पी.01 जी.ए.2071) घेऊन दिलीप पन्नालाल कौशल हे जात हान वळणावर वाहन अनियंत्रित झाले. आणि रस्त्यावर उलटले. यामध्ये वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, वाहनात भरून मुंबईला नेण्यात येत असलेली शिमला मिरचीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर शिमला मिरची पसरली होती.


कॉपी करू नका.