भुसावळ सत्र न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठ्याचा विनयभंग
भुसावळ (21 डिसेंबर 2024) : पोलिस ठाण्यात 2021 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात येथील न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठीचा संशयीतांने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. यामुळे न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली.
काय घडले नेमके ?
फेब्रुवारी 2021 मध्ये वाळू वाहतूकीचा डंपर महिला तलाठी यांनी पकडला होता, याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात महिला तलाठी या शुक्रवारी न्यायालयात साक्ष देण्यास आल्या होत्या. यावेळी संशयीत सुनील विश्वनाथ भोई (रा.साकेगाव, ता.भुसावळ) याने महिला तलाठी यांच्या पाठीवरून हात फिरविला. यामुळे महिला तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात भोई विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पालवे पुढील तपास करीत आहे.


