ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने भुसावळातील पत्रकार मजहर शेख यांचा सन्मान


भुसावळ (19 डिसेंबर 2024) : शहरातील सीबीएन न्यूज 18 डिजिटलचे मुख्य संपादक मजहर शेख यांचा वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. नागपूर शहरातील झाशीची राणी चौकातील अमृत भवनात नुकत्याच झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या 15 वर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

त्यात भुसावळातील पत्रकार मजहर शेख यांनाही सन्मानीत करण्यात आले. फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.मनीषा ठाकरे यांनी पत्रकार मजहर शेख आणि अजहर शेख यांना भारतरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानीत केले. पुरस्कार मिळाल्यानंतर शेख बांधवांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


कॉपी करू नका.