मस्सजोग सरपंच हत्येचा भुसावळातील सकल मराठा समाजातर्फे निषेध


भुसावळ (19 डिसेंबर 2024) :  बीड जिल्ह्यातील मस्सजोग सरपंच हत्येचा भुसावळ शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाने निषेध करीत या खुनाची चौकशी करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा
सरपंच हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, खटल्यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, हत्येमागील सूत्रधार यांना तत्काळ अटक करण्यात यावी, घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, हत्येतील देशमुख कुटुंबातील व्यक्तींना खटल्याचा निकाल लागेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर सकल मराठा समाज शहर व तालुक्याचे अध्यक्ष रवींद्र जगन्नाथ ढगे, माजी नगरसेवक राजेंद्र दत्तू आवटे, शैलेश ठाकरे, अ‍ॅड.तुषार पाटील, रवींद्र लेकुरवाळे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, वसंत पाटील, कृष्णा शिंदे, आनंद ठाकरे, ज्ञानेश्वर आमले अ‍ॅड.हरीश पाटील, के.एस.पाटील, रवींद्र वाघ, विकास सोनवणे, केशव पाटील, योगेश मधुकर वाघ, गौतम चंद्रकांत जाधव आदींच्या सह्या आहेत.


कॉपी करू नका.