जिल्ह्यात अपघातांची मालिका : डंपरवर दुचाकी आदळून घार्डीतील दोघे तरुण ठार

फुपनगरी फाट्याजवळ अपघात : नियंत्रण सुटलेली दुचाकी डंपरवर आदळली


Two young Gardai killed after bike hits dumper जळगाव (19 डिसेंबर 2024) : जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळ समोरून येणार्‍या डंपरला दुचाकी वर आलेल्या दोघांनी जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या घार्डी येथील दोन जणांचा जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

काय घडले नेमके ?
पंकज शंकर कोळी (26) आणि अमोल आनंदा कोळी (27, दोन्ही रा.घार्डी ता.जळगाव) हे दोघे मित्र कामावरून दुचाकी क्रमांक (एम.एच.19 ए.व्ही. 3446) ने घरी घार्डी येथे जात असताना जळगाव तालुक्यातील फुफनगरी फाट्याजवळ दोघांच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने समोरून येणार्‍या डंपर (एम.एच.19 झेड.8067) ला त्यांची दुचाकी धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पंकज आणि अमोल या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली .

घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


कॉपी करू नका.