जळगावात भंगार चोरी प्रकरणात सूत्रधार पसार कसा : आमदार राजूमामांचा सवाल
जळगावातील पोलिसांवर केले गंभीर आरोप : सूत्रधाराच्या पाठीमागे कोण ?
नागपूर (22 डिसेंबर 2024) : शहरातील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे भंगार व पाईप चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार कसा ? त्याला कोण वाचवत आहे ? या सूत्रधाराला पाठीशी घालणार्या पोलीस अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी काल विधानसभेमध्ये केली.
काय घडले विधानसभेत ?
आमदार राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. जळगाव शहरात पाईप चोरीचा गुन्हा सध्या गाजतो आहे या गुम्ह्णात काही संशयितांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे., असे आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत सांगितले आमदार राजूमामा भोळे पुढे म्हणाले की , जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी सूत्रधारांना पाठीशी घालत गुन्हा नोंदवताना खाडाखोड केली आहे. अशा दोषी अधिकार्यांवर कारवाई व्हावी. ब्रिटिशकालीन पाईपलाईन व भंगार चोरीच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधाराला जे लोक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे,
माजी विरोधी पक्षनेताच आरोपी
आमदार राजूमामा भोळे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी, माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती व माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचे नाव या गुम्ह्णात आरोपी म्हणून आल्याने जळगावच्या राजकारणात हा मुद्दा वातावरण तापवणारा ठरतो आहे सुनील महाजन आता अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असले तरी गुन्हा नोंदवला गेलेला असल्याने त्यांची डोकेदुखी सहज संपणारी नाही . त्याचवेळी आमदार राजूमामा भोळे आपल्या प्रतिस्पर्ध्याला सहज दिलासा मिळू नये म्हणून प्रयत्न करतील अशीही चर्चा आहे .