पिंप्रीहाट तलाठ्यासह पंटराला जळगाव एसीबीकडून अटक


Pimprihat Talatha along with Pantara arrested by Jalgaon ACB भडगाव (27 डिसेंबर 2024) : तीन हजारांच्या लाच प्रकरणात पिंप्रीहाट तलाठ्यासह खाजगी पंटराला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
वडिलोपार्जित शेत-जमिनीत बहिणीच्या हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व 7/12 उत्तारे देण्याच्या मोबदल्यात पिंप्रीहाट, ता.भडगाव आरोपी तलाठी शेळके व खाजगी पंटर धीरज यांनी सुरूवातीला चार हजार रुपये लाच मागून तीन हजार रुपये स्वीकारण्याचे 4 डिसेंबर 2024 रोजी मान्य केले मात्र संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर शुक्रवारी पहाटे आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तपास जळगाव उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.