मुख्यमंत्र्यांचे निर्देश : संतोष देशमुख हत्येतील पसार आरोपींची संपत्ती होणार जप्त !


Chief Minister’s directive : The properties of the accused in Santosh Deshmukh’s murder will be confiscated! मुंबई (28 डिसेंबर 2024) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहे. बीड जिल्ह्यात ज्या लोकांचे बंदुकींसोबतचे फोटो समोर येत आहेत, त्यांची खातरजमा करून त्यांचा शस्त्र परवाना जप्त करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी बीड पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहेत.

19 दिवस उलटूनही तीन आरोपी पसार
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेला जवळपास 19 दिवस उलटले तरी अद्याप फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.

संतोष देशमुख हत्याकांडातील जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत.

अंजली दमानिया यांनी मात्र प्रकरणातील आरोपींचा खून झाल्यासंदर्भात माहिती देणारा आपल्याला कॉल आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. या संदर्भातील माहिती आपण बीडच्या एसपींना दिली आहे. त्यामुळे पुढील चौकशी करण्याचे त्यांचे काम असल्यचे त्या म्हणाल्या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !