अकलूदला पोदार स्कूलच्या बसखाली आल्याने कासवेतील प्रौढ ठार
बस रिव्हर्स घेताना दुर्घटना : अपघातानंतर चालक झाला पसार
Akaludla Podar, an adult from Turtle Bay, was killed after being run over by a school bus. यावल (28 डिसेंबर 2024) : बस चालक विद्यार्थ्यांची ने-आण करणारे वाहन मागे घेत असताना बसखाली आल्याने कासवे, ता.यावल येथील 55 वर्षीय प्रौढ ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी यावल तालुक्यातील अकलूद येथे घडला. अपघातानंतर जमावाचा उद्रेक पाहता चालकाने बस जागीच सोडून धूम ठोकली. अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
धडक बसताच प्रौढाचा मृत्यू
अकलूद, ता.यावल गावाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे. शुक्रवारी सकाळी या स्कूलची बस (क्रमांक एम. एच. 21 बी.एच.0613) घेऊन चालक हा गावाजवळील पहेलवान ढाब्यासमोर होता व बस मागे घेत असताना दाढी-कटींग करण्यासाठी बाहेर पडलेल्या पंडीत मोहन बादशाह (55, रा.कासवे) यांना धडक बसली व ते बसखाली येवून जागीच ठार झाले. या अपघातानंतर चालक घाबरून बस सोडून तेथून पसार झाला.
पोलिसांनी घेतली धाव
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी, हवालदार विकास सोनवणे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. पंचनामा करून बस देखील ताब्यात घेतली. पाडळसा पोलीस पाटील सुरेश खैरनार यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.