फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ईदू पिंजारी बिनविरोध निवड
फैजपूर (30 डिसेंबर 2024) : वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेची वार्षिक कार्यकारिणीची बैठक फैजपूर येथे झाली. यावेळी ईदू पिंजारी यांची फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रा.उमाकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष योगेश सोनवणे व विद्यमान अध्यक्ष मयूर मेढे यांनी अध्यक्षपदाचा पदभार ईदू पिंजारी यांच्याकडे सोपवला.
असे आहे नूतन पदाधिकारी
कार्यकारिणीच्या या नव्या संघटनेत विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. सचिव संजय सराफ, सहसचिव राजू तडवी, खजिनदार अरुण होले, कार्याध्यक्ष प्रा.राजेंद्र तायडे तर प्रसिध्दी प्रमुख मयूर मेढे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे, मलक शाकीर, सलीम पिंजारी, शेख कामील, जावेद काझी मोईउद्दीन शेख यांचा समावेश करण्यात आला. या बैठकीदरम्यान संघटनेच्या भविष्यातील दिशा आणि उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली. नूतन अध्यक्ष ईदू पिंजारी सह पदाधिकारी पत्रकार यांचे माजी जिल्हा दुध संचालक व उपनगराध्यक्ष हेमाराज चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माजी अध्यक्ष मयूर मेढे यांनी केले.