ग्राहकांना दिलासा : गॅस सिलिंडरच्या दरात अशी झाली कपात
न्यूज डेस्क । जळगाव (2 जानेवारी 2025) : नववर्षात गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून व्यावसायीक गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. गत पाचव्या महिन्यापासून व्यावसायीक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढल्या होत्या माव नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे.
जळगावात आता इतक्या रुपयांना सिलिंडर
खरंतर सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यानुसार आज 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये 14.50 रुपयांची घट झाल्याचं दिसून आले. तर दुसरीकडे मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील आठ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचे दर स्थिर आहेत. जळगावात घरगुती गॅसचा दर 808 रुपये इतका आहे.


राजधानी दिल्लीमध्ये आजपासून व्यावसयीक सिलिंडर 1804 रुपयांना मिळणार आहे, याआधी 1818.50 रुपयांना मिळत होता. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 1756 रूपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. कोलकातामध्ये 1 जानेवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1911 रुपये झाली. कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 16 रुपयांनी कमी झाली. मुंबईतील सिलिंडरची किंमत 15 रुपयांनी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये 1771 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून 1756 रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1966 रूपयांना मिळेल.








