सरत्या वर्षात जळगाव एसीबीचे 37 सापळे, 60 लाचखोरांना बेड्या

लाचखोरांवर कारवाईबाबत जिल्हा परिषदेचा प्रथक क्रमांक : तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन


Jalgaon ACB sets 37 traps, arrests 60 bribe takers in the past year जळगाव (2 जानेवारी 2025) : सरत्या वर्षात जळगाव एसीबीने लाचखोरांविरोधात जोरदार कारवाई केली. तब्बल 37 सापळे यशस्वी करण्यात आले असून त्यात 60 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

बड्या अधिकार्‍यांवरही कारवाई
वर्ग एकचे चार, वर्ग दोनचा एक, वर्ग तीनचे 30, वर्ग चारचे सहा तर इतर लोकसेवकासह सहा व खाजगी 13 इसमांवर कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने वर्षभराच्या कारवाईत सर्वाधिक जिल्हा परिषदेतून सात कारवाया करण्यात आल्या तर 14 आरोपींना अटक करण्यात आली. यासोबतच महसूल विभागात देखील 7 कारवाई करत 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

  • या विभागातील लाचखोरांवर एसीबीची कारवाई
    महसूल विभाग- सात कारवायांमध्ये 11 आरोपी
    जिल्हापरिषद विभाग- सात कारवायांमध्ये 14 आरोपी
    पोलीस विभाग- पाच कारवायांमध्ये 8 आरोपी
    विज वितरण विभाग- चार कारवायांमध्ये 8 आरोपी
    उद्योग, उर्जा व कामगार विभाग- दोन सात कारवायांमध्ये दोन आरोपी
    शिक्षण विभाग- दोन कारवाईत 2 आरोपी
    सरपंच व इतर लोकसेवक- चार कारवाईत 7 आरोपी
    खाजगी इसम- दोन कारवाईत दोन आरोपी
    आर.टी.ओ. विभाग- एका कारवाईत दोन आरोपी
    दारुबंदी विभाग- एका कारवाईत दोन आरोपी
    म.न.पा. विभाग- एका कारवाईत एक आरोपी
    बी.एच.आर. पतसंस्था- एक कारवाईत दोन आरोपी

एकूण 37 सापळ्यात 60 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत 2023च्या तुलनेत 2024 मध्ये अधिक पाच कारवाया वाढल्या आहेत. 2023 मध्ये 32 कारवायांमध्ये 51 आरोपी होते तर 2024 मध्ये 37 कारवायांमध्ये 60 आरोपी अटकेत गेले आहेत.

तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन
ही कारवाई नाशिक पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जळगाव पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर व सहकार्‍यांनी केली. लाचखोरांवर कारवाईसाठी 97024-33131, 0257-2235477, टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !