लहान मुलांच्या खेळण्यातील एक कोटींच्या नोटा भुसावळात जप्त : खामगावातील संशयीत ताब्यात

भुसावळ लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई : फसवणुकीच्या उद्देशाने मनोरंजनाच्या नोटा वाहतुकीचा संशय


भुसावळ (28 मार्च 2025) : भुसावळ रेल्वे स्थानकावर एका संशयीताकडून लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने लहान मुलांच्या खेळण्यातील तब्बल एक कोटीच्या नोटा जप्त केल्या आहेत. जप्त नोटांचे बाजारमूल्य शून्य रुपये असलेतरी मनोरंजनासाठी असलेल्या या नोटांवर पाचशे रुपये किंमतीचे अस्सल नोट लावण्यात आली असल्याने कुठेतरी फसवणुकीचा डाव शिजत असल्याचा यंत्रणेला संशय आहे. अक्षय चब्रुलाल सरवणे (28, सती फाईल, रेखा प्लॉट, खामगाव, जि.बुलढाणा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. संशयीताची लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संशयास्पद स्थितीत तरुण आढळला
भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक सुधीर धायरकर व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पाचुराम मीना यांच्या मार्गदर्शनालीखाली गस्तीवरील कर्मचार्‍यांनी गुरुवार, 27 रोजी सायंकाळी सात वाजता संशयीत अक्षय सरवणे यास संशयास्पद हालचालीवरून रेल्वे स्थानकाच्या जीन्यावर ताब्यात घेतले. संशयीताच्या बॅगेची झडती घेतली असता चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया व पाचशे रुपये लिहिलेल्या 19 हजार 932 नोटांची एकूण 20 बंडले आढळली तसेच प्रत्येक बंडलावर पाचशे रुपयांची असली नोटही आढळली. एकूण 34 हजार रुपये मुल्यांच्या असली 68 नोटा यंत्रणेने जप्त केल्या.





नाशिक डिलेव्हरीपूर्वीच संशयीत यंत्रणेच्या जाळ्यात
खास सूत्रांच्या माहितीनुसार, संशयीत अक्षय चब्रुलाल सरवणे यास मनोरंजनाच्या नोटांची बॅग नाशिक येथे राहुल ठाकूर नामक संशयीताला डिलीव्हरी करायची होती यासाठी तो नांदुरा, ता.खामगाव येथून रेल्वेत बसला व पाचोर्‍यापर्यंत गेल्यानंतर त्यास पुन्हा माघारी फिरण्याबाबत व्हॉटसअ‍ॅप कॉल आल्याने तो पाचोर्‍यातून पुन्हा माघारी फिरला. बसने तो खामगाव जाण्यासाठी भुसावळ रेल्वेस्थानकाबाहेर पडत असताना यंत्रणेने त्यास ताब्यात घेतले.

संशयीताची कसून चौकशी
मनोरंजनाच्या नोटा सापडल्याने कायद्यान्वये गुन्हा दाखल करता येत नाही मात्र संशयीताच्या मोबाईलवर आलेला व्हॉटसअ‍ॅप कॉल व संशयीताच्या माहितीवरून आम्ही राहुल ठाकूरचा शोध घेत आहोत, असे भुसावळ लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !