नागरिकांनो आजपासून बदललेल्या नियमांची माहिती नसल्यास तुमच्या खिशाला बसेल मोठी आर्थिक झळ


जळगाव (1 एप्रिल 2025) : एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून बँकांनी अनेक नियम बदलले असून या नियमांमुळे महिन्याच्या बजेटवर परिणाम होणार आहे. एटीएमपासून ते युपीआयपर्यंत अनेक नियमांमध्ये बदल घडले आहे. तुम्हाला या नियमांची माहिती नसल्यास तुमच्या खिशाला कात्री बसेल यात शंकाच नाही.

बचत खात्यात हवी किमान रक्कम
तुम्हाला बचत खात्यात किमान रक्कम बॅलेंस ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. प्रत्येक बँकेची लिमिट ही वेगवगेळी असते. त्यामुळे तुम्हाला बचत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागणार आहे नाहीतर दंड भरावा लागेल.

एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात बदल
1 एप्रिलपासून एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात बदल होऊ शकतो. स्टेट बँक, आयडीबीआय, एचडीएफसी बँक त्यांच्या व्याजदरात बदल करु शकतात. कदाचित हे व्याजदर वाढू शकतात किंवा कमीदेखील होऊ शकतात.

नवीन नियम
आता काही यूपीआय अकाउंट्स बंद होणार आहे. ज्या नागरिकांना अनेक दिवसांपासून यूपीआय अकाउंट वापरले नाही त्यांचे अकाउंट्स बंद केले जाणार आहेत. तुमचा फोन नंबर लिंक असेल पण तुम्ही यूपीआय वापरत नसाल तर तुमचे सर्व रेकॉर्ड डिलिट केले जातील.

क्रेडिट कार्डचे नियम
क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डवरील अनेक फायदे आता संपणार आहेत. तुम्हाला याआधी अनेक रिवॉर्ड, कॅशबॅक सुविधा मिळत होत्या. आता या सुविधा मिळणार नाहीत.

पॉझिटिव्ह पे सिस्टीम
आता तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम चेकद्वारे काढायची असेल तर त्याची माहिती आधीच बँकेला द्यावी लागणार आहे. बँकांनी त्यांच्या व्यव्हारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

डिजिटल बँकिंग फीचर
आता डिजिटल बँकिंमध्ये एआय असिस्टंटचा वापर केला जाणार आहे. यामुळे डिजिटल व्यव्हार अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क
रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे. आता तुम्ही फक्त काही लिमिटपर्यंतच एटीएममधून कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक व्यव्हारासाठी 20 ते 25 रुपये द्यावे लागणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !