कामाख्या एसी एक्स्प्रेसच्या सात लिनेन बॉयने पैसे घेवून दिले बर्थ : रेल्वे सुरक्षा बलाकडून आरोपींना बेड्या

रॅकेटचा पर्दाफाश : प्रवाशांना चादर, ब्लॅकेट देणारे सात लिनेन बॉय यंत्रणेच्या जाळ्यात


Seven linen boys of Kamakhya AC Express gave away berths in exchange for money : Railway Protection Force shackles the accused भुसावळ (21 एप्रिल 2025) : रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यात प्रवाशांना ब्लँकेट व चादर देणार्‍या लिनेन बॉयकडून होणार्‍या अवैध प्रवासी वाहतुकीचा वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश झाला. पथकाने रविवारी 12519 लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या (एलटीटी-कामाख्या) एसी एक्सप्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ स्थानकादरम्यान अचानक तिकीट तपासणी मोहिम राबवली. यात सात जणांना ताब्यात घेण्यात आले.

सात संशयीत ताब्यात
वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बलाने रविवारी अचानक कारवाई सत्र सुरु केले. 12 फिरते तिकीट तपासनीस (टीटीई) आणि मनमाड येथून सहभागी झालेले 5 आरपीएफ कर्मचार्‍यांनी कामाख्या एक्सप्रेसमध्ये केलेल्या पाहणीत एसीकोचमध्ये विना तिकिट प्रवासी आढळून आले. तपासात या गाडीतील प्रवाशांना ब्लँकेट व चादर देणार्‍या ठेकेदारीत काम करणारे लिनेन बॉय यांनी प्रवाशांकडून पैसे घेवून त्यांना एसीच्या डब्यात बसवून प्रवास करू देत असल्याचे निदर्शनास आले. विनतिकीट प्रवासाला प्रोत्साहन देणार्‍या लिनेन बॉय शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफीकुल इस्लाम, सद्दाम हुसैन, हबीब (पूर्ण नावे माहित नाही) यांना अटक करण्यात आली आहे.




132 प्रवाशांकडून दंड वसूल
रेल्वे विभागाने राबवलेल्या मोहिमेत बिनातिकिट व अनियमीत तिकिट असलेल्या 132 प्रवाशांकडून तीन लाख 82 हजारांचा दंड वसूल केला. या मोहिमेमुळे बिनतिकीट प्रवासाच्या रॅकेटला आळा बसला असून, प्रवाशांना सुरक्षित आणि पारदर्शक प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !