भुसावळातील शिवसेनेतर्फे पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेध


Shiv Sena in Bhusawal condemns Pahelgam terrorist attack भुसावळ (25 एप्रिल 2025) :  बेछूट गोळीबारात 28 पर्यटक मृत्युमुखी पडले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवारी तीव्र निषेध करून प्रांत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी संघटनेचा जाहीर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तर प्रांत कार्यालयाबाहेर पाकिस्तानचा ध्वज असलेले पोस्टर जाळण्यात आले. ज्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांना देखील भारतीय सैन्यातील वीर जवानांनी शोधून त्यांना ठार करावे, अशी मागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे निवेदनातून केली.

यावेळी निवेदन देताना भुसावळ शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष माळी, महिला तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक हमीद भाई, शिवसेना उपशहर संघटक सोनी ठाकूर, युवा सेना युवाधिकारी पवन भोळे, भुसावळ शहर संघटक मयूर सुरवाडे, शिवसेना महिला समाजसेविका दीपाली बर्‍हाटे, शिवसैनिक दीपक धांडे, सौरभ पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

सावद्यात पहेलगाम हल्याचा निषेध
सावदा : शहरात पहेलगाम दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ बुधवार, 23 रोजी येथील संभाजी चौकात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीतर्फे निषेध सभा झाली. यावेळी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रथम स्वामी भक्तीप्रियदासजी यांच्याहस्ते श्रद्धांजलीपर दीप प्रज्वलित करण्यात आला. यानंतर उपस्थित नागरिकांनी मेणबत्या पेटवत श्रद्धांजली अर्पित केली.

यावेळी माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी, माजी नगरसेविका रंजना भारंबे, बेटी बचावच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, माजी उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शाम अकोले, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, शिवसेना शहराध्यक्ष सुरज परदेशी, शहरातील शरद भारंबे, भरत नेहेते, मेहश अकोले, संतोष परदेशी, मनीष भंगाळे, निलेश खाचणे, सागर चौधरी, सागर पाटील, नितीन खरे, दीपक श्रावगे, राकेश पाटील यांच्यासह शहरातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते. सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना निवेदन देत हल्ल्यातील आरोपींना पकडून कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !