भुसावळ शहरात ईस्लामी अतिरेक्यांचा जाळला पुतळा
पहेलगाम हल्ल्याचा शहरासह विभागात निषेध : संस्था, संघटनांतर्फे प्रशासनाला निवेदन

Effigy of Islamic extremists burned in Bhusawal city भुसावळ (25 एप्रिल 2025) : जम्मू-काश्मिरच्या पहेलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर ईस्लामी अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्याने 28 पर्यटकांचा मृत्यू ओढवला होता. त्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून या हल्ल्यानंतर समाजमन संतप्त झाले आहे. भुसावळात हिंदूतत्वादी संघटनांनी ईस्लामी अतिरेक्यांचा पुतळा जाळत संताप व्यक्त केला तर शहर व विभागात विविध संस्था, संघटनांतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाचे आंदोलन
भुसावळ : विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. इस्लामी अतिरेक्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. हिंदू समाजाने एकत्र येऊन अशा हिंसेविरोधात उभं राहण्याचे आवाहन करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
भुसावळ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भुसावळ शाखेच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांची धर्म विचारल्यानंतर गोळ्या झाडून हत्या झाल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा संयोजक मोहित देसाई, नाहाटा महाविद्यालय अध्यक्ष विद्या बाणाईत, महेंद्र ठाकुर सह अन्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वाहिली श्रद्धांजली
भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना बुधवारी शाळेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर व विद्यार्थ्यांनी कॅण्डल लावून दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
