अर्धनग्न तरुणांची दहशत ; गाड्या अडवून केली दगडफेक : गाडेगावातील प्रकार

Terror of half-naked youth; Blocked vehicles and threw stones : Incident in Gadegaon गाडेगाव (22 एप्रिल 2025) : जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गाडेगावजवळ असलेल्या सुप्रीम कंपनीजवळ 15 ते 20 अर्धनग्न तरुणांनी गाड्या अडवून त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने अनेक वाहनांच्या काचा फुटल्याने नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महामार्गावरील गाडेगावात असलेल्या सुप्रीम कंपनीजवळ 15 ते 20 अर्धनग्न तरुण हातात तलवारी घेतल्या होत्या. या तरुणांनी महामार्गावरून येणार्या जाणार्या वाहनांना अडवून त्यांच्यावर त्यांनी दगडफेक केली. तर काही गाड्यांवर अंडी फेकली.