जळगावात पूर्व वैमनस्यातून तरुणावर गोळीबार : दोन आरोपींना अटक


Youth shot dead in Jalgaon over past enmity : Two accused arrested जळगाव (25 एप्रिल 2025) : जुना वाद उफाळून आल्यानंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमास आलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सजवळ गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेतील तरुण घरात शिरल्याने सुदैवाने बचावला होता तर पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार
महेंद्र सपकाळे यांचा मित्र भूषण मनोज अहिरे याचा वाढदिवस असल्याने तो त्याचे मित्र अक्षय नारायण राठोड (उर्फ गण्या) आणि सचिन चौधरी यांच्यासोबत गुरूवार, 24 एप्रिल रोजी रात्री 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास सेंट जोसेफ शाळेच्या गेटसमोर केक कापण्यासाठी आला होता. यावेळी संशयीत विशाल भिकन कोळी, बाबु बन्शीलाल धोबी (दोन्ही रा.पिंप्राळा) आणि वैभव धिरज कोळी (रा.धरणगाव) आणि भोला भोई (पिंप्राळा) हे अनोळखी पाच संशयीत आल्यानंतर त्यांनी वाद घातला.




संशयीतांकडून गोळीबार व मारहाण
विशाल कोळी याने महेंद्र सपकाळे यास धमकावत म्हटले की, राम नवमीच्या दिवशी तू माझ्या वडिलांना मारले आहेस त्यामुळे मी तुला जिवंत सोडणार नाही. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता विशालने त्याच्या कमरेला लपवलेली बंदूक काढली आणि महेंद्रच्या उजव्या बाजूला पाठीमागील उजव्या ढुंगणावर गोळी झाडली. इतकेच नव्हे, तर बापू धोबी, वैभव कोळी आणि भोला भोई या तिघांनीही महेंद्रला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दरम्यान, विशाल कोळी आणखी एक गोळी झाडण्याच्या तयारीत असताना, महेंद्रचे मित्र सचिन चौधरी आणि भुषण अहिरे यांनी प्रसंगावधान राखत विशालला जोरदार धक्का दिला. या झटापटीत सचिन चौधरीला किरकोळ दुखापत झाली. गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली त्यामुळे विशाल कोळी आणि त्याचे साथीदार तेथून पळून गेले. गोळी लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महेंद्रने त्वरित त्याचा मित्र मनोज रमेश भालेराव याला फोन करून मदतीसाठी बोलावले. मनोज तातडीने घटनास्थळी पोहोचला आणि त्याने महेंद्रला आपल्या दुचाकीवरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

दोन आरोपींना अटक
गोळीबार प्रकरण दोन आरोपींना रामानंद पोलिसांनी अटक केली असून उर्वरीत संशयीतांचा कसून तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !