कुर्हेपानाचे घरातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी दरवाजात उघडताच बसला धक्का : ट्रक चालकाने उचलले टोकाचे पाऊल

Citizens were shocked as soon as they opened the door due to the foul smell of kurhepan emanating from the house: Truck driver took extreme measures भुसावळ (19 मे 2025) : घरातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी दरवाजा उघडताच ट्रक चालक तरुणाचा मृतदेह आढळला. ही
घटना भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे गावात शुक्रवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संदीप वसंत पाटील (40, रा.कुर्हेपानाचे, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पषट
संदीपची पत्नी माहेरी निघून गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता.गेल्या काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. याबाबत संदीप पाटील यांचे काका एकनाथ पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसात माहिती दिली. त्यात शुक्रवारी त्यांच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने एकनाथ पाटील व मुलगा गजानन पाटील यांनी जावून पाहिल्यावर संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले.
संदीपच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
मृतदेह भुसावळ येथिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला होता. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नितीन चौधरी करत आहेत.
