मी छगन भुजबळ शपथ घेतो की….! नाराजी नाट्यानंतर मिळाले मंत्री पद


मुंबई (20 मे 2025) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा झाला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती मात्र आता भुजबळांची ही नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. आता हेच खाते पुन्हा एकदा भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे व येवला-लासलगाव मतदारसंघातील जनतेचे, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे, तसेच समता परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेषतः आभार मानतो. मंगळवारी मंत्रीमंडळातील नेते व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहू शकतात, त्यामुळेच हा दिवस निवडण्यात आला आहे. ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल , ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !