दीपनगरच्या शंभर टन राखेची चोरी : दोघांविरोधात गुन्हा

भुसावळ (24 जून 2025) : दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्राच्या मालकीचे असलेले शंभर टन राख विनापरवाना चोरी केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्रातून निघालेली राख ही कुर्हा परिसरात ठेवली जाते. या ठिकाणाहून परवानगी देवून ही राख विकली जाते. रविवार, 22 जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास हनुमान विठ्ठल येवले (35, रा.जालना) आणि रोशन भुवनेश्वर गोपे (34, रा.झारखंड) या दोघांनी विनापरवाना कुर्हा येथील शंभर टन राख विना परवाना चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर औष्णिक विद्यूत केंद्राचे तंत्रज्ञ मोहीत चव्हाण यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून हनुमान विठ्ठल येवले (35, रा.जालना) व रोशन भुवनेश्वर गोपे (34, रा.झारखंड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार हेमंट मिटकरी हे करीत आहे.