मोहराळ्यात प्रॉपर्टी वादातून तरुणाचा खून : यावलच्या निलंबित पोलिस कर्मचार्याला बेड्या

Youth murdered over property dispute in Moharala: Suspended police officer from Yaval arrested यावल (25 जून 2025) : प्रॉपर्टीच्या वादातून मोहराळा येथील 19 वर्षीय तरुणाचा निलंबित पोलिस कर्मचार्यांच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलांनी खून केला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर निलंबित पोलिस कर्मचार्याला अटक करण्यात आली. दोघा अल्पवयीनांना 14 दिवसांसाठी अभिरक्षा कोठडी तर पोलिस कर्मचार्याला 28 जून पर्यंतची पाच दिवसाची पोलिस कोठडी यावल न्यायालयाने सुनावली.
असे आहे नेमके प्रकरण
मोहराळा गावातील रहिवासी साहिल शब्बीर तडवी (19 ) या तरुणाला निलंबित पोलिस कर्मचारी अय्युब हसन तडवी यांच्या सांगण्यावरून मोहराळा गावातीलच दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनी शेत विहिरीत ढकलून त्याचा खून केला होता. याप्रकरणी दोन अल्पवयीन व निलंबित पोलिस कर्मचार्याविरोधात यावल पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते.

सोमवारी अल्पवयीन यांना विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसासाठी बालनिरीक्षक अभिरक्षा कोठडीत ठेवण्याची आदेश न्यायालयाने दिले तर निलंबित पोलिस कर्मचारी अय्युब तडवी याला यावल येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांच्या समोर हजर केले असता 28 जून शनिवारपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलिस हवलदार वासुदेव मराठे करीत आहे.
