भुसावळातील दे.नाा.भोळे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी


भुसावळ (27 जून 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. फालक होते. प्राचार्यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला. बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. शाहू महाराजांनी पहिल्यांदाच मागासवर्गीयांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केले. त्यांच्या विचारांमुळेच आज समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात आले. त्या सोबतच त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा आणि शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या, हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण असल्याचे प्राचार्य म्हणाले. शाहू महाराज हे समाजप्रबोधनाचा एक आदर्श मानले जातात. ते विचारवंत समाजसुधारक होते. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असेही आवाहन प्राचार्यांनी केले.









तरुण पिढीने महाराजांचा विचार अंगीकारावा
इतिहास विभागप्रमुख प्रा.श्रेया चौधरी म्हणाल्या की, आजच्या काळातील परिस्थिती लक्षात घेता आज समाजाला सामाजिक समता, बंधुता आणि समावेश या मूल्यांची आवश्यकता अधिक आहे म्हणून शाहू महाराजांचा विचार तरुण पिढीने अंगीकारला पाहिजे. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.गोविंदा वाघुळदे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.दयाघन राणे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.डॉ.आर.बी.ढाके याांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अनिल सावळे यांनी तर आभार प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण यांनी मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !