चालकाच्या डुलकीने घेतले समृद्धी महामार्गावर चौघांचे बळी


Driver’s nap claims four lives on Samruddhi Highway वाशिम (5 जुलै 2025) : समृद्धी महामार्गावर कार चालवताना चालकाला डुलकी लागताच भरधाव कार दुभाजकावर आदळली व या अपघातात कारमधील उमरेडच्या व्यापार्‍यासह चौघे ठार झाले.

काय घडले महामार्गावर
कौटुंबिक कार्यक्रम आटोपून पुणे येथून नागपूरच्या दिशेने कार एकाच कुटूंबातील सदस्य प्रवास करीत असताना समृद्धी महामार्गावर शेलुबाजार ते मालेगावदरम्यान गुरुवारी रात्री आठच्या सुमारास चालकाला डुलकी लागताच कार अनियंत्रीत होवून दुभाजकाला धडकली.








या अपघातात उमरेड येथील प्रसिद्ध व्यापारी राधेश्याम शिवनारायण जयस्वाल (67), वैदेही कीर्ती जयस्वाल (25), माधुरी कीर्ती जयस्वाल (43) आणि संगीता अजय जयस्वाल (52) ठार झाले. कार चालक चेतन हेलगे (25) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर वाशिम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राधेश्याम जयस्वाल यांचा मोठा मुलगा राज याच्या मुलाचा नामकरण सोहळा गुरुवारी पुणे येथे होता. यामुळे कुटुंबीय तेथे गेल्यानंतर परतीच्या प्रवासात भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !