नाशिकमध्ये भीषण अपघातात सात जण ठार
मृतांमध्ये तीन महिलांसह तीन पुरूषासह बालकाचा समावेश

Seven people killed in a horrific accident in Nashik नाशिक (17 जुलै 2025) : भरधाव अल्टो व दुचाकीमध्ये धडक होवून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. हा अपघात दिंडोरी-वणी रोडवर मध्यरात्री झााल. या अपघातात अल्टो कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर अल्टो कार रस्त्याशेजारील नाल्यात पलटली होती. नाकातोंडात पाणी गेल्याने कारमधील सर्व जणांचा जागीच मृत्यू झालातर मोटर सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वनी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक एम.एच.04 डीवाय 6642 व एका मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेला नाल्यामध्ये पलटी झाली.

यांचा झाला मृत्यू
अपघातात देविदास पंडित गांगुर्डे (28), मनीषा देविदास गांगुर्डे (23), उत्तम एकनाथ जाधव (42), अल्का उत्तम जाधव (38), दत्तात्रेय नामदेव वाघमारे (45), अनुसया दत्तात्रय वाघमारे (40), भावेश देविदास गांगुर्डे (02) अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, दुचाकीवरील मंगेश यशवंत कुरघडे (25) व अजय जगन्नाथ गोंद (18) जखमी आहेत. सिव्हीलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अल्टो गाडीतील मृतांचे नातेवाईक मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेले होते. ते परत त्यांचे गावी जात असताना हा अपघात झाला.
