‘सैयारा’तील लव्ह स्टोरीची तरुणाईला भुरळ : तीन दिवसात ‘रेकॉर्डब्रेक’ कमाई


Saiyara मुंबई (21 जुलै 2025)  : अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा म्युझिकल रोमँटिक ड्रामा ‘सैयारा’ चित्रपटाने तरुणाईला भूरळ घातली आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल 83 कोटींची कमाई केली आहे. अगदी नवख्या कलाकारांच्या एका सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुराळा उडवला आहे. आधी या सिनेमाकडे कुणी लक्षही दिलं नाही, पण या सिनेमानं पहिल्याच दिवशी बंपर गल्ला जमवताच सर्वांनाच या चित्रपटाला पाहण्याचे वेड लागले आहे.

तिकीट खिडकीवर धुमाकूळ
बड्या सुपरस्टारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जे करता आलं नाही, ते ‘सैयारा’ सिनेमानं केलं. नवखे सिनेस्टार्स असूनही विक्की कौशलच्या सुपरहिट ‘छावा’ नंतर, हा चित्रपट 2025 मध्ये तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालणारा दुसरा चित्रपट आहे.




चित्रपटगृहात दाखल झाल्यानंतर, अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या दमदार अभिनयानं सजलेल्या या चित्रपटाची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना आवडली आणि त्यानंतर तो पाहण्यासाठी लोकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. यासह, ब्लॉकबस्टर ओपनिंग असताना, दुसर्‍या दिवशीही ’सैयारा’नं चमत्कार केला आणि भरपूर कमाई केली. दोन दिवस उत्तम गल्ला जमवल्यानंतर ‘सैयारा’ विकेंडला काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पण तिसर्‍या दिवशी म्हणजेच, रविवारी, ‘सैयारा’नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाले तर ‘सैयारा’नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 21 कोटींचा व्यवसाय केला.

दुसर्‍या दिवशी, चित्रपटाने 19.05 टक्के वाढ दाखवली आणि 25 कोटींची कमाई केली.

त्याच वेळी, सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सैयारा’नं रिलीजच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच, रविवारी 37 कोटींची कमाई केली आहे,





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !