सरकार पुन्हा अडचणीत : मंत्री कोकाटेंचे वादग्रस्त विधान ; म्हणाले, महाराष्ट्राचे सरकारच भिकारी !


Agriculture Minister Manikrao Kokate मुंबई (22 जुलै 2025) : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी संपताना दिसत नाही. मी राज्यातील शेतकर्‍यांना भिकारी म्हणालो नव्हतो तर महाराष्ट्राचे सरकारच भिकारी असल्याचे कोकाटे यांनी म्हटल्याने राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काय म्हणाले कोकाटे
माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्‍यांच्या एक रुपयात पिक विमा संदर्भात देखील आपण केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या वादावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र हे स्पष्टीकरण देत असताना त्यांनी मी शेतकर्‍यांना भिकारी म्हणालो नव्हतो, असे सांगितले.






वास्तविक शेतकरी नाही तर शासनच भिकारी असल्याचे म्हटले आहे. शासन शेतकर्‍यांकडून एक रुपया घेतो. त्याचा अर्थ शासनच भिकारी आहे, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नाही तर त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

नेमके काय म्हणाले होते कोकाटे
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, शेतकर्‍यांकडून एक रुपया शासन घेते. शेतकर्‍यांना एक रुपया आम्ही देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही. पण, त्याचा अर्थ उलटा केला. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि त्या पीक विम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज साडे अर्ज सापडले. माझ्याच काळात सापडले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या.

आतापर्यंत कृषीचे कमीत कमी 52 जीआर निघाले, इतक्या घोषणा मी केलेल्या आहेत. पुढील सहा महिन्यात मोठा बदल कृषी विभागात आपल्याला बघायला मिळेल. शंभर दिवसाच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलेला आहे, असा नंबर आपोआप येतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !