आमदार खडसे व्यक्ती नसून विकृती : आमदार मंगेश चव्हाण यांचा हल्लाबोल


MLA Khadse is not a person but a perversion : MLA Mangesh Chavan’s attack जळगाव (25 जुलै 2025) : आमदार एकनाथ गणपत खडसे ही एक व्यक्ती नसून एक विकृती असल्याचा हल्लाबोल भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री महाजन व माजी मंत्री खडसे यांच्यात प्रफुल लोढा प्रकरणावरून सध्या वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद झाली.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे, दोन्ही जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी व चंद्रकांत बाविस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.






भाजपा एक विचार : आमदार चव्हाण
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, वारंवार एखादी गोष्ट खोटे बोलून रेटून सांगायची या पद्धतीच्या माध्यमातून भाजपाचे पक्ष नेतृत्व बदनाम करायचं हा खडसे यांचा कायमस्वरूपीचा धंदा आहे. खरंतर एकनाथ खडसे नेहमी सांगतात की, मी 40 वर्षापासून पक्ष वाढवला. पक्ष मी मोठा केला मात्र भारतीय जनता पार्टी हा एक विचार आहे. या प्रवाहामध्ये अनेक लोक आले. अनेक खडसेंसारखे बाजूला झालेत. हा विचार कोणीही देशात थांबवू शकला नाही. मंत्री गिरीश महाजन यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना पुरावे देऊन बोलावे, हवे तर पुरावे घेऊन आमने-सामने या असे आव्हान आ. मंगेश चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले.

आरोप करताना पुरावे द्यावेत : आमदार राजूमामा भोळे
आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, विकासाला घेऊन पुढे जायला हवे. आमदार खडसेंनी 40 वर्षांत चांगले काम केले असेल मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आरोप करताना पुरावेदेखील दिले पाहिजे. बेछूट आरोप मंत्री महाजन यांच्याविषयी होऊ नये. देशासह राज्यात, जिल्ह्यात विकासाची गंगा सुरु आहे. महाजन यांनी हुडकोचे कर्ज मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध विकासासाठी भाजपच्या नेत्यांनी निधी आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. आमदार अमोल जावळे यांनीदेखील खडसेंनी पुरावा असल्यानंतरच बोलावे, असे सांगितले.

खडसे यांचे वय वाढलेय
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, खडसेसाहेब, खरंतर तुमचं वय वाढलय. आम्ही तर काय परमेश्वराला सांगूच की, तुम्हाला परमेश्वराने जास्त आयुष्य दिलं पाहिजे. कारण की भाजपात तुम्ही नसताना तुमच्या समोर भारतीय जनता पार्टीचे सगळे कर्तृत्ववान नेते, आमदार काम कसं करता ते बघायलाही कोणी असलं पाहिजे. राज्याचा विधानसभेतला एखादा सदस्य, एखादा माजी मंत्री, ज्यावेळेस काही बोलतो त्याच्याजवळ पुराव्यांचा आधार असला पाहिजे.

खडसेंकडे कुठलाही एक पुरावा नसताना आपण वारंवार मंत्री गिरीश भाऊंच्या चारित्र्याविषयी हनन करतात. माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे, आपण आपल्या स्वतःच्या गावात, सांगाल तिथे, मी मागे आपल्याला अनेकदा सांगितलं आहे. आपण कुठल्याही मुद्यावर अगदी विकासाच्या मुद्यावर सांगा, चारित्र्याच्या मुद्यावर सांगा, तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या मुद्यावर सांगा, तुम्ही करप्शन म्हणतात, कुठल्याही मुद्यावर आपण समोरासमोर यावं. वर्षानुवर्ष आपण असे बिनबुडाचे आरोप करून जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची गिरीशभाऊंची प्रतिमा मलीन करण्याचा वारंवार जो प्रयत्न करत आहे हा अतिशय चुकीचा लज्जास्पद आणि खालच्या स्तराला जाणार आहे, असेही आमदार चव्हाण म्हणाले.

हवेत बाण मारणे योग्य नाही : मंत्री सावकारे
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, आरोप-प्रत्यारोप काही दिवसांपासून सुरू असून त्याला अर्थ नाही. पुरावे असल्याशिवाय हवेत बाण मारणे बरोबर नाही. आमदार खडसेंनी भाजपच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य करणे थांबावे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !