ड्रग्ज पार्टी प्रकरण : प्रांजल खेवलकरांना न्यायालयीन कोठडी


Drug party case: Pranjal Khewalkar remanded in judicial custody पुणे (31 जुलै 2025) : माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली. पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे प्रांजल खेवलकरांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला.

या आधी दोन महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता उर्वरित पाच आरोपींनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने या सर्वांना जामीनाचा मार्ग मोकळा झाला.






पुणे पोलिसांची मागणी फेटाळली
प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसर्‍या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !