आठ पुरुषांसोबत लग्न करून लूट करणारी ‘दुल्हन’ जाळ्यात


‘Bride’ who marries eight men and robs them caught in the net नागपूर (1 ऑगस्ट 2025) : आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अटक लुटेरी दुल्हनला बेड्या ठोकल्या. भामटी महिला विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करायची व एका महिन्यात भांडण करून त्या पुरुषांकडून पैसे उकळण्यास सुरुवात करायची. समीरा फातिमा असे महिलेचे नाव असून ती उच्चशिक्षित व शिक्षक आहे.

सोशल मिडीयातून करायची ओळख
सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची, त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांची फसवणूक करायची, असा प्रकार या महिलेकडून सुरू असतानाच गुलाम पठाण यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.






विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षापासून फरार असलेल्या ‘लुटेरी दुल्हन’ ऊर्फ समीरा फातिमाला अखेर गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. तिचा पोलिस कोठडीतील कालावधी आज संपणार आहे. समीरा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची, त्यांच्याशी लग्न करून खोटे निकाहनामे दाखवून त्यांची फसवणूक करत होती. ती विवाहित पुरूषांना महिन्याभरातच खोट्या आरोपात फसवण्याच्या धमक्या देत होती. कोर्टकेस करत सेटलमेंटच्या नावावर मोठी रक्कम वसूल करत होती. ही फरार महिला सिव्हिल लाइन्स येथील टपरीवर चहा प्यायला आली असता पोलिसांनी तिला अटक केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !