अट्टल दरोडेखोरांची टोळी जाळ्यात
Gang of persistent robbers caught लातूर (3 ऑगस्ट 2025) : बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला घातक शस्त्रांसह अटक करण्यात आली. औसा आणि भादा पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेच्या आधारावर सिंघाळा-शिवली मोड परिसरात एका संशयास्पद अशोक लेलँड टेम्पोला अडवून कारवाई केली. पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांकडून धारदार शस्त्र, हत्यारे जप्त केली आहेत. एकूण सात लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. लातूर शहर लातूर ग्रामीण एमआयडीसी पोलीस ठाणे, औसा, भादा, निलंगा उदगीर या भागात या टोळीने सातत्याने घरफोडीचे काम केली आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात या टोळीने गुन्हे केले आहेत का? याचा तपास लातूर पोलीस करत आहेत.





