15 लाखांची सोन्याची बिस्किटे बंगाली कारागीराने लांबवली
Bengali artisan crafts gold biscuits worth Rs 15 lakh सातारा (6 ऑगस्ट 2025) : सदाशिव पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्समधून वेडणे बनविण्यासाठी दिलेली 15 लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीराने धूम ठोकली. शाहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.
मुस्तकीन बंगाली (रा. डफर चौक, लाहाट, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत सराफ व्यावसायिक दिनेश दत्तात्रय देशमुख (वय 44, रा. बसाप्पा पेठ, करंजे सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.





बंगाली कारागीर मुस्तकीन हा सध्या कोरेगाव येथे राहत होता. तो सातार्यात येऊन दागिने बनविण्यासाठी घेऊन परत कोरेगावला जायचा. त्यानंतर तयार झालेले दागिने परत आणायचा.
गेल्या दोन वर्षांपासून तो विश्वासाने दागिने आणून देत होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला होता. काही दिवसांपूर्वी 15 तोळ्यांची दोन सोन्याची बिस्किटे त्याच्याकडे वेडणं बनविण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, हे दागिने परत न देता तो अचानक गायब झाला. आणखी काही व्यावसायीकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
