कोल्हापूर हादरले : आधी आवळला गळा नंतर पत्नीच्या गळ्यावरून फिरवला चाकू
Kolhapur shaken : First strangled, then knifed around wife’s neck कोल्हापूर (7 ऑगस्ट 2025) : सातत्याने पत्नीने विविध कारणावरून घेत असलेल्या कर्जामुळे वैतागलेल्या पतीने वादानंतर पत्नीचा आधी गळा आवळला व नंतर पत्नीच्या गळ्यावरून चाकू फिरवला. या प्रकारानंतर पतीने पोलिसांना माहिती कळवली. ही घटना कोल्हापुरात घडली आहे. परशराम पांडुरंग पाटील (44) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय घडले कोल्हापूरात ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशराम पाटील हे मूळचे राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील असून, ते सध्या महालक्ष्मीनगर येथे पत्नी अस्मिता (44), दोन मुले आणि वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होते. ते उद्यमनगरमधील फौंड्रीत काम करत होते. 5 रोजी रात्री, त्यांची मुले बाहेर होती आणि वडील दुसर्या खोलीत झोपले होते. तेव्हाच परशराम आणि अस्मिता यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात परशरामने पत्नीचा गळा दाबून बेशुद्ध केले, त्यानंतर घरातल्या चाकूने गळा कापून तिचा खून केला. नंतर त्यांनी स्वतःहून पोलिसांना फोन करून घटनेची कबुली दिली.





वादाचा मूळ कारण काय?
परशरामच्या सांगण्यानुसार, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचं घर विकलं होतं. त्यातून मिळालेली रक्कम, इतरांकडून घेतलेले हातउसने पैसे आणि मुलांच्या नावावर फायनान्स कंपनीतून घेतलेलं प्रत्येकी एक लाख रुपयांचं कर्ज याची स्पष्ट माहिती अस्मिता देत नव्हती. याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. मंगळवारी रात्री अशाच एका वादात ही दुर्दैवी घटना घडली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने मोबाईलवरून 112 नंबरवर पोलिसांना फोन केला व नंतर अटक करवून घेतली.
