जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी विकासावर भर द्यावा : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे


Leaders in Jalgaon district should focus on development: Union Minister Raksha Khadse जळगाव (9 ऑगस्ट 2025) : पुण्यातील कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केल्यानंतर आरोपांच्या फैरी सातत्याने सुरू आहेत. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर प्रकरण आणखीच चिघळले आहे. त्यातच जळगावात आलेल्या मंत्री रक्षा खडसे यांना या प्रकरणाबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांनी विकासावर भर द्यावा, असे सांगत या विषयावर भाष्य टाळले आहे.

नेत्यांनी विकासाच्या मुद्यांवर बोलावे
आमदार एकनाथ खडसे व खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवरून भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या जे काही सुरू आहे, त्याच्या वेदना मला सुद्धा होत आहेत, असे रक्षा खडसे म्हणाल्या. शेवटी राजकारण आहे, कशा पद्धतीने जाते आहे, हे तुम्ही सुद्धा बघत आहात, असे त्या म्हणाल्या.





पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यात या गोष्टी सुरू आहेत. त्या कशा पद्धतीने सुरू आहेत, या सर्वांना माहीत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. नेता कुणीही असो त्याने विकासावर भर दिला पाहिजे, अशी या जिल्ह्याची आणि मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे.

शेतकर्‍यांचे असतील किंवा विकासाचे असतील अनेक मुद्दे आहेत, त्याकडे कुणीही नेता असो त्याने लक्ष दिले तर जिल्ह्याचे चांगले होईल, असे म्हणत रक्षा खडसे यांनी भाजपा नेत्यांना घरचा आहेर देत नाराजी व्यक्त केली आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !