बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्धेचा मृत्यू

Elderly man dies in leopard attack नाशिक (9 ऑगस्ट 2025) : बिबट्याच्या हल्ल्यात 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. जनाबाई जगन बदादे (65) असे मयत शेतकरी महिलेचे नाव आहे. शेतात कामे करत असताना बिबट्याने महिलेवर हल्ला करून तिला उसात ओढून नेले. ही घटना दिंडोरी शिवारातील बदादे वस्तीवर घडली.
तिसरा बळी : नागरिकांचा रास्ता रोको
दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला आहे., मयत महिलेचे नातेवाईक ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणत संताप व्यक्त केला. तसेच नाशिक कळवण रस्त्यावर मृतदेह ठेवत रास्ता रोको केला. पोलिस आणि नातेवाईक यांच्यात संघर्ष सुरू झाला. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. सुमारे दीड तास रास्ता रोको सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

अचानक केला हल्ला
जनाबाई जगन बदादे (65) या आपल्या शेतातील घराजवळ शेतात कोथिंबीर काढणी करत असताना शेजारच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला व उसात ओढून नेले. आजीने हल्ला होताच आरडा ओरड केल्याने, त्यांचा मुलगा संजय व इतर नातेवाइकांनी धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र या या हल्ल्यात आजीचा मृत्यू झाला.
