ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत आरपीएफच्या कारवाईत पाच अल्पवयीन मुले सुरक्षित


Five minors rescued in RPF operation under Operation Nanhe Farishte भुसावळ (18 सप्टेंबर 2025) : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सतत प्रवासी सुरक्षेबरोबरच अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासाठीदेखील कार्यरत आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते या विशेष मोहिमेंतर्गत नाशिक रोड व मनमाड स्थानकावर वेगवेगळ्या कारवाईत पाच अल्पवयीन मुले सापडून त्यांना सुरक्षितपणे बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.

अल्पवयीन मुले सुरक्षित
रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी सांगितले की, रविवार, 14 सप्टेंबर रोजी नाशिक रोड स्थानकावर गस्तीदरम्यान आरपीएफचे सहायक फौजदार दिनेश यादव व हवालदार अतुल बारी यांना दोन अल्पवयीन बालक असहाय अवस्थेत प्लॅटफॉर्मवर भटकताना आढळले. तत्काळ त्यांना सुरक्षिततेसाठी चाईल्ड लाईन सदस्य सुवर्णा वाघ यांच्या उपस्थितीत आरपीएफ कार्यालयात आणले.






चौकशीत त्यांनी आपली नावे चंद्रकांत (7, रा.रोकडोबावाडी, मते नगर, नाशिक रोड) व जिगर (13) अशी सांगितली. दोघांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना बाल संरक्षण अधिनियमान्वये बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.

याच दिवशी मनमाड स्थानकावर पुष्पक एक्सप्रेस (12533) मध्ये एक अल्पवयीन मुलगा घरून पळून जात आहे. अश्या मिळालेल्या माहितीवरून मनमाड स्टेशनवर गाडी येताच जनरल डब्यांत शोध घेण्यात आला. यावेळी बी.बी.श्रीवास, सहायक फौजदार एस.डी.ठाकरे, धर्मेंद्र यादव व दीपक सानप यांच्या पथकाने 17 वर्षीय उत्कर्ष राजपूत (रा. सूतहा, ता. तालग्राम, जि. कन्नौज, उत्तर प्रदेश) याला शोधून ताब्यात घेतले.चौकशीत त्याने रागाच्या भरात घर सोडल्याचे सांगितले.त्याचा वैद्यकीय तपास करून त्यालाही चाईल्डलाईनच्या सुवर्णा वाघ यांच्या मदतीने नाशिक येथील बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले.

या कारवाईत आरपीएफ जवानांनी दाखविलेली दक्षता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अशी मोहिम सातत्याने राबवली जाणार असल्याचेही स्पष्ट केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !