स्टेट बँकेच्या नावाने फोन आल्यास सतर्क रहा : जळगावातील तरुणाला सव्वा लाखांचा गंडा


A young man from Jalgaon was cheated of one and a half lakhs! जळगाव (3 ऑक्टोबर 2025) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून शहरातील नोकरदार तरुणाला एक लाख 32 हजारांचा गंडा घालण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण ?
शहरातील निमखेडी रोड, शिवधाम मंदिर परिसरात प्रणेश प्रकाश ठाकुर (34) वास्तव्यास आहेत. 25 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांना 8720067307 या मोबाईल क्रमांकावरून एका व्यक्तीचा कॉल आला. कॉल करणार्‍याने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीकडे त्यांच्या क्रेडिट कार्डासंबंधी काही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला.

प्रणेश ठाकुर यांनी आपली कोणतीही गोपनीय माहिती त्या व्यक्तीला दिली नाही मात्र तरीही संशयिताने क्रेडिट कार्डमधून एक लाख 32 हजार 142 रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली व त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी प्रणेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !