यावल नगरपरीषदेने नियमबाह्य निविदा मंजुर केल्याची तक्रार


निविदा रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा तक्रारदाराचा इशारा

यावल- नगरपरीषदेव्दारे कार्यक्षेत्रातील दोन मिटर उंची असलेली झाडे सेल्फ वॉटरींग ट्री गार्डसहीत एक वर्षाच्या देखभाल तत्वावर कामासाठी पात्र उमेदवारास डावलून देण्यात आलेली नियमबाह्य निविदा तत्काळ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन यावल येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गावडे यांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांना दिले आहे.
आपल्या तक्रार निवेदनात सुनील गावडे यांनी म्हटले आहे की, यावल नगरपरीषदच्या कार्यक्षेत्रातील दोन मीटर उंचीचे झाडे व सेल्फ वॉटरींग ट्रिगार्ड सहीत एक वर्षासाठी देखभाल तत्वावर काम करणेकामी नगर परिषदव्दारे सदर काम देण्यासाठी शासनाने योग्य त्या वर्गात नोंदणीकृत मक्तेदार यांच्याकडून ई- निविदा बी वनप्रमाणे यावल येथील मक्तेदार प्रकाश पारधे व जळगाव येथील अनिल मंगेश पाटील यांनी ई- निविदा समाविष्ठ केली असतांना, यात शासनाच्या निविदेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या डीएसआर सुचिप्रमाणे निविदा मध्ये आयटीएम असून या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाची नोंदणीपत्र असण आवश्यक व बंधनकारक असतांना सुद्धा पात्र मक्तेदाराची निविदा रद्द करण्यात येवून ज्या व्यक्तिकडे शासनाने ठरवुन दिलेल्या अटी शर्ती संदर्भात कुठलेही कागदपत्रे नसताना त्या मक्तेदार व्यक्तिस निविदेपेक्षा जास्त दराने काम देण्यात आले. आमची निविदा ही कमी दराची असतानही आम्हाला या प्रक्रीयेतून डावण्यात आले. निविदा तत्काळ रद्द न केल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशाराही सुनीत गावडे यांनी तक्रार निवेदनाद्वारे दिला आहे.


कॉपी करू नका.