हुडहुडी भरवणारी थंडी : भुसावळात तापमान 13.8 अंशांपर्यंत घसरले


Bitter cold: Temperature drops to 13.8 degrees in Bhusawal भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींमुळे भुसावळ विभागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री शहराचे किमान तापमान प्रथमच 13.8 अंशांपर्यंत घसरले तर कमाल तापमानाचा पारा 32.5 अंशांवर होता. दिवसाच्या कमाल तापमानातही सरासरी दोन ते अडीच अंशांनी घसरण झाली आहे. शहरात वाढलेल्या थंडीमुळे हूडहूडी वाढली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमी होत आहे. यासोबतच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड हवा उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असल्याने उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव भुसावळ विभागावर दिसून येत आहे. शहरात सोमवारी किमान तापमान 14.1 होता तर रविवारी 14.3 अंशावर होते. शनिवारी शहराच्या तापमानाचा पारा 15.6 अंशांवर होता. यामुळे शहराचे किमान तापमान दिवसागणीक वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !