वरणगावात घडला इतिहास : विकासाचा ट्रॅक्टर चालला ; सुनील काळेंचा दणदणीत विजय

मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथ खडसेंना जनतेने नाकारले


गणेश वाघ
History was made in Varangaon : The tractor of development is on the move; Sunil Kale wins with a resounding victory. भुसावळ (21 डिसेंबर 2025) : राज्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वरणगाव पालिकेच्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीला वरणगावकरांनी नाकारत अपक्ष उमेदवार सुनील काळे यांना निवडून दिले. मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असतीतरी जनतेने साफपणे त्यांना नाकारल्याचे या निवडणुकीत दिसून आले. विकासाच्या ट्रॅक्टरला जनतेने कौल दिल्याने काळे समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

वरणगावात घडला इतिहास
वरणगाव पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार शामल अतुल झांबरे यांना पाच हजार 686 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार सुनील रमेश काळे यांना सहा हजार 468 मते मिळाली व 782 मतांनी सुनील काळे येथे निवडून आले.

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा
मंत्री गिरीश महाजन व मंत्री संजय सावकारे यांच्या गळ्यातील ताईत असलेले निष्ठावान कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचे तिकीट कापून भाजपाने येथे श्यामल झांबरे यांना उमेदवारी दिली मात्र काळे यांनी समर्थक व नागरिकांच्या साथीने बंडखोरी करीत रान पेटवले. वरणगावकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रचार त्यांनी केला शिवाय भाजपाने धनशक्ती असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याचे रान त्यांनी पेटवले. जनतेने त्यांना उत्स्फूर्तपणे डोक्यावर घेत भाजपा उमेदवारासह राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला नाकारले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !