सावदा नगराध्यक्षपदी भाजपाच्या रेणुका पाटील विजयी
भाजपा-शिवसेना युतीचे 10 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक विजयी
BJP’s Renuka Patil has won the Savda municipal council president election सावदा (21 डिसेंबर 2025) : सावदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाससाठी भाजपाच्या रेणुका राजेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे यांचा 173 मतांनी पराभव करीत विजय मिळविला.
निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी
रविवार, 21 रोजी सकाळी 10 वाजता नगरपालिका कार्यालयाजवळील पूरक इमारतीत ही मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वर्मा यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यासाठी सहा टेबल लावण्यात आले. सकाळपासून उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी पालिके जवळ निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली. पहिला निकाल जवळपास 10.45 वाजेच्या सुमारास लागला. निकाल ऐकल्यानंतर उमेदवार व त्यांचे समर्थक जल्लोष करीत होते.

असे आहे बलाबल
सावदा पालिकेत भाजपा व शिवसेनेचे प्रत्येकी पाच उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सात उमेदवार, अपक्ष 3 उमेदवार विजयी झाले.
असा आहे निकाल
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या रेणुका राजेंद्र पाटील (सहा हजार 827) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे मिळालेली (सहा हजार 654) यांचा 173 मतांनी पराभव केला. तसेच दीपाली राहुल धांडे (508), अलका बबन बडगे (367) यादेखील पराभूत झाल्या. नोटाचा 186 मतदारांनी वापर केला.
प्रभाग निहाय विजयी उमेदवार
प्रभाग 1 अ- विशाल भागवत कोळी (अपक्ष) विजयी
प्रभाग 1 ब- सीमरन राजेश वानखेडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग 2 अ- राजेश गजाननराव वानखेडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग 2 ब- पठाण तबसुमबानो फिरोजखान (शिवसेना बिनविरोध)
प्रभाग 3 अ- विशाल प्रेमचंद तायडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभागा 3 ब- सुनीता संजय तायडे विजयी (अपक्ष)
प्रभाग 4 अ- नकुल नितीन बेंडाळे (भाजपा विजयी)
प्रभाग 4 ब- विजया कुशल जावळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग 5 अ- जयश्री अतुल नेहेते (भाजपा विजयी)
प्रभाग 5 ब- सचिन चुडामन बर्हाटे (भाजपा विजयी)
प्रभाग 6 अ- प्रतीक्षा मनीष भंगाळे (शिवसेना विजयी)
प्रभाग 6 ब- फिरोज खा आब्दार खा (शिवसेना विजयी)
प्रभाग 7 अ- रंजना जितेंद्र भारंबे (भाजपा बिनविरोध निवड)
प्रभाग 7 ब- शाम अविनाश अकोले (अपक्ष विजयी)
प्रभाग 8 अ- सीमा वेडू लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग 8 ब- पंकज राजाराम येवले (भाजपा विजयी)
प्रभाग 9 अ- रेखा राजेश वानखेडे विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग 9 ब- हेमंत रूपा महाजन (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग 10 अ- रुखसार शेख सलीम अहमद पिंजारी
प्रभाग 10 ब- फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण (बिनविरोध शिवसेना)
निवडणुकीसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील व सहकार्यांनी चोख बंदोबस्त राखला.
