यावल नगरपालिकेच्या भाजपा गटनेतेपदी नंदा महाजन
आमदार अमोल जावळे यांच्या निर्णयातून महिला सशक्तीकरणाला नवे बळ
Nanda Mahajan has been appointed as the BJP group leader in the Yaval Municipal Council यावल (30 डिसेंबर 2025) : यावल नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नगरसेविका नंदाताई राजेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली. ही निवड रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावल नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला गटनेतेपदाची संधी मिळाल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.
ऐतिहासीक निर्णय
या निवडीमुळे यावल नगरपालिकेच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महिला सशक्तीकरणाचा विचार केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष कृतीतून राबवण्याची भूमिका आमदार अमोलभाऊ जावळे यांनी या निर्णयातून स्पष्ट केली आहे.

स्त्री शक्तीवर विश्वास ठेवत, लाडक्या बहिणींना नेतृत्वाची संधी देण्याचा दूरदर्शी निर्णय आमदार अमोलभाऊ जावळे यांनी घेतला असून, महिलांना निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणण्याचा त्यांचा प्रयत्न यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे.
नंदा महाजन यांच्या निवडीमुळे नगरपालिकेच्या कामकाजात सकारात्मक बदल घडतील, नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे व संवेदनशीलतेने न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक निर्णयाचे जिल्ह्यातून विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, महिला सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल यावल नगरपरिषदेच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
