बोरावल-टाकरखेडा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित
यावल (14 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील तापी काठावरील बोरावल बुद्रुक बोरावल खुर्द व पिंपरी आणि टाकरखेडा येथील ग्रामपंचायतच्या कार्यवाही तपासणी करणे समितीने अभिलेखाची मागणी केली असता सदरची अभिलेखे उपलब्ध न झाल्याने चौकशीचे कामकाज पूर्ण करता आलेले नाही. प्रशासकीय अनियमिते सुषमा कोळी या स्वतः व्यक्तीचा जबाबदार आहेत याबाबत प्राथमिक चौकशी अहवाल रावेर पंचायत समिती गटविकास अधिकारी या चौकशी समितीने सादर केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी त्यांना निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.
देशमुखवाडीत केली नियुक्ती
सुषमा कोळी यांना चाळीसगाव अंतर्गत ग्रामपंचायत देशमुख वाडी येथे निलंबन काळात मुख्यालय उपस्थित राहण्याचे आदेश करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील नियम तीन भाग (1) च्या तरतुदीनुसार सुषमा दिलीप कोळी ग्रामपंचायत अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले श्रीमती सुषमा कोळी यांना ग्रामपंचायत अधिकारी बोरावल बुद्रुक बोरावल खुर्द यांना निलंबन कालावधीत पंचायत समिती चाळीसगाव अंतर्गत ग्रामपंचायत देशमुख वाडी यांचे मुख्यालय देण्यात येत आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यात ग्राम पंचायत विभागात एकच खळबळ उडाली आहे.







