चाळीसगावात डॉक्टरांच्या घरातून लाखाचा ऐवज लांबवला
Goods worth lakhs stolen from doctor’s house in Chalisgaon चाळीसगाव (14 फेब्रुवारी 2026) : शहरातील शास्त्री नगर, खरजई नाका परिसरात एका डॉक्टरच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 98,983 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
तक्रारदार डॉ.विनोद रघुनाथ अमृतकर (42) हे शास्त्री नगर भागात राहतात. 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर गेले असताना मध्यरात्री 1.43 ते 2.8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरुममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला. यामध्ये एकूण 98 हजार 983 रुपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे.


