भुसावळातील भोळे महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवानिमित्त फूड स्टॉल व कुकिंग स्किल कार्यक्रम
Food stall and cooking skill program on the occasion of cultural festival at Bhole College, Bhusawal यावल (14 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फूड स्टॉल व कुकिंग स्किल कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पाककला कौशल्य विकसीत करणे, आरोग्याबाबत जागरूकता, व्यवहार ज्ञान, उद्योजकतेची भावना रुजविणे तसेच स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून आकर्षक पद्धतीने फूड स्टॉल उभारले. पारंपरिक तसेच आधुनिक पदार्थांची चव चाखण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पी फालक यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर कौशल्याधारित उपक्रमांमध्येही पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन केले तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व व्यवस्थापन कौशल्य विकसीत होते, असे मत व्यक्त केले.
यांनी पटकावला क्रमांक
या महोत्सवात नृत्य स्पर्धेत प्रथम साक्षी कल्याणकर व माहेश्वरी इंगळे तर द्वितीय मोसमी धनगर आली. गीत गायन प्रथम तोशीता पीसाळकर व द्वितीय प्रतीक्षा वाघ तसेच फॅन्सी ड्रेसमध्ये प्रथम नम्रता तांबे, द्वितीय कांचन पाटील, हस्त कला प्रथम तोशीता पीसाळकर, द्वितीय कांचन पाटील व माळी भैरवी. फ्लॉवर डेकोरेशन प्रथम मोसमी तांबे व आरती वराडे द्वितीय नम्रता तांबे व पाक कला प्रकारात प्रथम हिमेश देऊलकर, द्वितीय कांचन पाटील व हर्षल कुर्हाडे, तृतीय ज्ञानेश्वरी भोई आली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. भविष्यातही अशा कौशल्यविकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.






