!-- afp header code starts here -->

गुजराथी उद्योगपतींच्या घशात जागा घालण्यासाठी राहुल नार्वेकरांची मध्यस्थी : व्हायरल व्हिडिओवर खासदार राऊतांचा दावा


Rahul Narvekar’s mediation to put a stop to Gujarati industrialists: MP Raut claims on viral video मुंबई (14 फेब्रुवारी 2026) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील राहुल नार्वेकरांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एक दाम्पत्य नार्वेकरांच्या सहकार्‍यांवर आरोप करताना दिसत आहे. आपण घरी नसताना आपल्या जमिनीची मोजणी कशी केली ? असा प्रश्न हे दाम्पत्य विचारताना दिसत आहे. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी त्या ठिकाणाहून पाय काढता घेतला. दरम्यान, या व्हिडिओवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत गुजराथी उद्योगपतीच्या घशाल जागा घालण्यासाठी नार्वेकर तेथे गेल्याचे ते म्हणाले आहेत.

उद्योगपतीच्या घशात जमिनी घालण्यासाठी प्रपंच
राहुल नार्वेकर हे कोकणातल्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप राऊतांनी केला. म्हात्रोळी गावातील जमीन ही एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी हवी होती, म्हणून नार्वेकर त्या ठिकाणी सरकारी अधिकार्‍यांना घेऊन गेले होते असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.


काय म्हणाले संजय राऊत ?
राहुल नार्वेकरांच्या या व्हिडीओनंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, गुजरातच्या एका उद्योजकाला फार्म हाऊस बांधायचं आहे, म्हात्रोळीतील ती जागा त्याच्या नजरेत भरली. ती जागा त्याच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर सरकारी मोजणी अधिकारी घेऊन गेले. कुटुंबातील एक कार्यक्रम असल्याने, त्या जागेचे मालक बाहेरगावी गेले होते, ते घरी नव्हते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सरकारी अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि मोजणी सुरू केली.

हा तर कोकणचे स्मशान करण्याचा प्रयत्न
या व्हिडीओमध्ये अर्धवट दिसतंय, त्या माऊलीने कुणाकुणाच्या कानफटीत मारलंय याचा पूर्ण व्हिडीओ समोर येईल. अधिकार्‍यांना मारहाण झालीय. आमच्या जमिनी तुम्ही बळकावताय मग आम्ही शांत बसू का? असं संजय राऊत म्हणाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये तेच सुरू आहे. गुजरातच्या टोळधाडी हे भाजपचे पुढारी विधानसभा अध्यक्ष कोकणामध्ये आणत आहेत. ते कोकणचं स्मशान करत आहेत, गुजरात करत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.

भांडण सोडवायला नार्वेकरांना कोण बोलावलं होतं?
ज्या माऊलीने अशा अधिकार्‍यांना मारहाण केली, मी त्या माऊलीचं अभिनंदन करतोय, तिने या सत्ताधार्‍यांची लायकी काय आहे हे महाराष्ट्राला दाखवलं. देवेंद्र फडणवीस हे स्वतःला चौकीदार समजतात आणि त्यांचे नेते शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावतात? नार्वेकर म्हणाले की, ते भांडण सोडवायला गेले. पण भांडण सोडवायला तुम्हाला कुणी बोलावलं? त्या आडवळणाला तुम्ही तिकडे का गेला?

शनिवारी आणि रविवारी राहुल नार्वेकर हे कोकणातच असतात, जमिनी पाहत असतात. अलिबागला गेल्यानंतर दिसेल की ते आता मराठी माणसाचं राहिलं नाही. रहेजा, लोढा अशा बिल्डरांनी त्या जागा बळकावल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !