!-- afp header code starts here -->

जेफरी एपस्टीनशी ‘ते’ संबंध नडले ; दुबईच्या सुल्तानाची हकालपट्टी


‘He’ had no relationship with Jeffrey Epstein; Expulsion of the Sultan of Dubai नवी दिल्ली (14 फेब्रुवारी 2026) : अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीनशी असलेल्या जवळच्या संबंधांचा खुलासा झाल्याने जगातील सर्वात आलिशान इमारती आणि समुद्रात ‘द पाम’ सारखे मानवनिर्मित आश्चर्य उभे करणारे दुबईचे प्रभावशाली उद्योगपती सुल्तान अहमद बिन सुलायेम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. . या खळबळजनक प्रकरणानंतर त्यांना जगातील सर्वात मोठ्या पोर्ट कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘डीपी वर्ल्ड’च्या ग्रुप चेअरमन आणि सीईओ पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले आहे.

काय आहे ‘एपस्टीन फाईल्स’मधील गौप्यस्फोट?
अमेरिकन न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये सुल्तान बिन सुलायेम यांचे नाव तब्बल 9,400 पेक्षा जास्त वेळा आले आहे. या फाईल्सनुसार, एपस्टीन सुलायेम यांना आपला सर्वात विश्वासू मित्र मानत असे. इतकेच नाही तर दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम यांचा ते उजवा हात असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकन खासदार थॉमस मॅसी आणि रो खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 ते 2018 या काळात सुलायेम आणि एपस्टीन यांच्यात अत्यंत खासगी आणि आक्षेपार्ह ई-मेल्सची देवाणघेवाण झाली होती.


‘ती’ सहल आणि टॉर्चर व्हिडिओ
या फाईल्समध्ये सुलायेम यांनी एपस्टीनला पाठवलेले, असे मेसेज सापडले आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या टोक्यो दौर्‍यातील लैंगिक मालिश आणि इतर वैयक्तिक क्षणांची माहिती दिली होती. याहून धक्कादायक म्हणजे, एका टॉर्चर व्हिडिओशी संबंधित ई-मेलमध्येही सुलायेम यांचे नाव समोर आले आहे. हे ईमेल सार्वजनिक होताच जगभरातून दबाव वाढला आणि अखेर शुक्रवारी त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा निखळला?
सुल्तान बिन सुलायेम हे गेल्या चार दशकांपासून दुबईच्या आर्थिक प्रगतीचा चेहरा होते. त्यांची कंपनी ‘डीपी वर्ल्ड’ दुबईच्या जीडीपीमध्ये 36% आणि युएईच्या जीडीपीमध्ये 12% योगदान देते. दुबईची ओळख असलेल्या ‘द पाम’ बेटांची निर्मिती करणार्‍या ‘नखील’ कंपनीच्या स्थापनेत त्यांची मुख्य भूमिका होती. ते दुबई कार्यकारी परिषद आणि युएई फेडरल टॅक्स अथॉरिटीचे सदस्य होते.

दरम्यान, ‘डीपी वर्ल्ड’च्या अधिकृत वेबसाईटवरून सुल्तान बिन सुलायेम यांची प्रोफाईल तातडीने हटवण्यात आली आहे. ज्या माणसाने दुबईला जागतिक व्यापाराचे केंद्र बनवण्यात आयुष्य घालवले, त्याचा असा शेवट होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !